MSEB India

Choose language : 

The MSEB Holding Company Limited is a Government of Maharashtra owned Company incorporated under the Companies Act, 1956 after trifurcation of the erstwhile Maharashtra State Electricity Board (“MSEB”).

म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनी मर्यादित

अस्वीकरण

या वेबसाइटवरील (http://www.msebindia.com) माहिती ही केवळ इच्छुक पक्षांना म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनी मर्यादित (“कंपनी”) विषयी माहिती देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली असून ती कोणत्याही प्रकारे कंपनीवर बंधनकारक नाही.  ही वेबसाइट कंपनीद्वारे सद्भावनेतून संकलित करण्यात आली आहे, परंतु यावरील माहितीची परिपूर्णता किंवा अचूकता यासंबंधी कोणतेही संकेत दिले गेलेले नाहीत अथवा कोणतीही हमी (व्यक्त किंवा निहित यापैकी) देण्यात आलेली नाही. म्हणून या माहितीच्या आधारे कृती करण्यापूर्वी कंपनीच्या संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून या माहितीची वैधता तपासून पाहावी अशी तुम्हाला विनंती करण्यात येत आहे.  या वेबसाइटला भेट देण्याच्या कृतीद्वारे तुम्ही यास मान्यता देत आहात की या वेबसाइटवर असलेली माहिती तसेच साहित्य यांचा वापर केल्यामुळे होणार्‍या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपाच्या नुकसानीस कंपनी जबाबदार नसेल.  या वेबसाइटवरील साहित्यासंबंधीचा कॉपीराइट हा कंपनीचा असून तो केवळ त्यांच्याकडेच राहील. तुम्हाला हे साहित्य उपलब्ध असले, तरी त्याद्वारे तुम्हाला ही माहिती पुनरुत्पादित करण्याचा आणि/किंवा ती वितरित करण्याचा परवाना आहे असे सूचित होत नाही. कंपनीच्या पूर्वानुमतीशिवाय अशी कोणतीही कृती करण्याची तुम्हाला परवानगी नाही.

Accessibility